पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी. हडपसरमधील काळेपडळ येथे बेकायदेशीरपणे चालणाऱ्या हुक्का पार्लर हडपसर पोलीसांनी धाड मारून कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान १५ हजार रुपये व वेगवेगळया कंपनीचे तंबाखुजन्यहुक्का फ्लेवर व इतर साहित्य पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोकुळे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदिप गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे असे हद्दीत अवैध हुक्का पार्लरची माहिती काढीत पेट्रालिंग करित फिरत असताना संकेत विहार, काळेपडळ पुणे येथे आले होते.
सदर ठिकाणी ड्रीम्स नाईट हॉटेल, काळेपडळ येथे आल्यानंतर सदर ठिकाणी हुक्का फ्लेवरचा वास आल्याने सदर ठिकाणी पंचाना बोलावून हुक्का पार्लर चालत असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. सदर हॉटेलमध्ये प्रवेश केला असता सदर हॉटेलमध्ये एकूण १४ पुरुष हे हुक्का ओढत असल्याचे दिसून आले.
त्या सर्वांना ताब्यात घेवून त्यांचेवर कारवाई करण्यात आलेली आहे. हुक्का पार्लर चालविणारे १) जयदिप रामचंद्र पवार वय २८ वर्षे रा. पवार आळी, जिल्हा परिषद शाळेमागे फुरसुंगी पुणे, २) अमोल पांडुरंग शेलार वय २९ वर्षे रा.स.नं. २०४, हिंद कॉलनी लेन नं. १ ढमाळवाडी फुरसुंगी पुणे यांनी नागरिकांना धुम्रपानासाठी अवैधरित्या हुक्का पुरवुन त्याठिकाणी हुक्का पार्लर चालविताना आढळून आले.
त्यांच्याविरुध्द हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम-२०१८ चे कलम-४ अ, २१ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रत्नदिप गायकवाड हे करीत आहेत.