एकच गोळी कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची गेम,सोबत असणाऱ्यांनीच केला खात्मा.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोथरूड परिसरातील सुतारदऱ्यात गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये जखमी झालेल्या मोहोळचा मृत्यू झाला असून त्याच्या मृत्यूने पुण्यात खळबळ उडाली आहे.आता त्याच्यावर गोळीबार करणाऱ्याचे नाव निष्पन्न झाले आहे. शरद मोहोळसोबत असणाऱ्यांनीच त्याच्यावर गोळीबार केल्याचं पोलिसांनी सांगितलं असून त्यापैकी एकाच नाव समोर आलं आहे.साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा. सुतारदरा, कोथरूड) याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी शरद मोहोळवर गोळीबार केलेला आहे.

कुख्यात गॅंगस्टर शरद मोहोळ याच्यावर गोळीबार, उडाली खळबळ. व्हिडिओ व्हायरल 😲

मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनीच गोळीबार केल्यामुळे आर्श्वय व्यक्त. येत आहे.गोळीबाराचं नेमकं कारण काय याचा त् पोलिस करीत आहेत.दरम्यान,मोहोळवर गोळीबार झाल्यानंतर त्याला उपचारासाठी सर्वप्रथम कोथरूड येथील सह्याद्री हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले होते तेथून त्याला ससून हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आला.

उपचारादरम्यान मोहोळला मयत घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, मोहोळच्या समर्थकांनी आणि नातेवाईकांनी ससून रूग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान,गुन्हयात निष्पन्न झालेल्या आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. आर्थिक आणि जमिनीच्या वादातून शरद मोहोळ याचा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here