दुकानदारा पाठोपाठ आता महा ई सेवा चालकांना देखील धुतलं?
प्रशांत खताळ यांनी ड” परिमंडळ विभागाचा कार्यभार स्वीकारल्या पासून चौकशी करण्याची मागणी.
पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎 ) प्रतिनिधी
तत्कालीन अन्न धान्य ड” परिमंडळ अधिकारी प्रशांत खताळ यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या आदेशालाच फाट्यावर मारल्याची बातमी पुणे सिटी टाईम्सने प्रसिद्ध केली होती. ती बातमी वाचून खताळ यांच्या विरोधात बर्याच तक्रारी पुणे सिटी टाईम्सकडे आल्या आहेत. तर बोलता बोलता काहींचे अश्रू अनावर झाले होते. रेशनिंग दुकानदारांची चांगलीच धुलाई करून मलाई खालल्याची चर्चा असतानाच आता नविन प्रकार समोर आला आहे.
ड” परिमंडळ विभागात रेशनिंग कार्डांची कामे घेऊन येणाऱ्या महा ई सेवा चालकांकडून प्रत्येक रेशनिंग कार्ड साठी हजार रुपयांचा आकडा ठरविण्यात आला होता. कोणी महा ई सेवा चालकाने एखाद्या वेळी कमी रूपये दिले तर कामे रोखण्यात येत असल्याचे काही महा ई सेवा चालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहेत. तर विषेश म्हणजे पैश्यांची देवाणघेवाण करण्यासाठी ड” परिमंडळ विभागातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.
त्याची खातरजमा करण्यासाठी पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधींनी कार्यालयात भेट घेतली असता, सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. असा सर्व प्रकार चालू असताना वरिष्ठांच्या निदर्शनास कसे काय आला नाही? खताळ यांनी ड” परिमंडळ विभागाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारल्या पासून सर्व चौकशी वरिष्ठ करणार का? असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे. आता वरिष्ठ काय कारवाई करतील याकडे लक्ष टिकून राहणार आहे. क्रमशः