पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या आदेशाला रेशनिंग अधिका-यांनी दाखवली केराची टोपली; तब्बल ४ महिन्यानंतर स्विकारला चार्ज

0
Spread the love

तब्बल ४ महिन्यानंतर प्रशांत खताळ पाय उतार तर लक्ष्मण माने हे विराजमान?

४ महिने रेशनिंग कार्डांवर व परमिटवर खताळ यांनी केलेल्या सहया अधिकृत आहे का अनधिकृत?

जो दे उसका भला जो ना दे उसपे कारवाई करतो भला? अशी ड” परिमंडळ विभागात चर्चा?

पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎 ) प्रतिनिधी

पुणे अन्न धान्य वितरण कार्यालयात मनमानी कारभार होत असल्याची ही पहिलीच घटना नव्हे, तर अश्या घटना वारंवार व आजही घडतच आहे. अधिकारी ऐवढे मस्तवाल झाले आहे की मॅनेज करून सर्व काही होऊ शकते अशी रेशनिंग खात्यातील एका नायब तहसीलदाराची मनसरनी झाली आहे. त्यात पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी काढलेल्या बदली आदेशालाच केराची टोपली दाखवली गेली आहे. यात विषेश म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील याबाबत मौन बाळगले आहे.जिल्हाधिकारी यांचे आदेश फाट्यावर मारणारे ई” परिमंडळ अधिकारी प्रशांत खताळ हे आहेत. त्याला साथ देणारे ग” परिमंडळ अधिकारी लक्ष्मण माने आहेत.

हकीकत अशी की अन्न धान्य ई ” परिमंडळ अधिकारी प्रशांत खताळ यांना ड” परिमंडळ अधिकारी ( प्रभारी) अतिरिक्त कार्यभार वर्ष,दीडवर्ष देण्यात आला होता. त्यांनी त्या काळात दुकानदारांची चांगलीच धुलाई करून हफ्ते वाढवून घेतल्याची खमंग चर्चा वाढतच गेल्याने ही बाब व तक्रारी वरिष्ठांकडे पोचल्या होत्या, त्या नंतर पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी यांच्या १९ सप्टेंबर २०२२ रोजी च्या आदेशानुसार अन्न धान्य ग” परिमंडळ अधिकारी लक्ष्मण माने यांना सदरील ड” परिमंडळ विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

परंतु खताळ यांनी दरमहा मिळणारी मलाई ही दुसऱ्याच्या ताटात न जाऊ देता खताळ यांनी फिल्डिंग लावून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला फाट्यावर मारून तब्बल ४ महिने २३ दिवस ड” परिमंडळ विभागाचा अतिरिक्त कार्यभार भोगला आहे. या ४ महिन्यात अन्न धान्य वितरण अधिकारी ( अतिरिक्त कार्यभार) सुरेखा माने यांच्या निदर्शनास सदरील बाब कशी काय आली नाही? हा चर्चेचा विषय बनला आहे.

खताळ यांनी लक्ष्मण माने यांच्याकडे कार्यभार का सोपवला नाही? किंवा माने यांच्यावर वरिष्ठांचा दबाव आणला होता का? याची देखील चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.खताळ यांनी ड” परिमंडळ विभागातील रेशनिंग दुकानदारांची चांगलीच पिळवणूक केल्याची व त्यातून मिळालेल्या मलाईतून पुण्यातील सर्वात महागड्या भागात फ्लॅट घेतल्याची चर्चा अन्न धान्य वितरण कार्यालयात रंगली आहे. १९ सप्टेंबर २०२२ पासून खताळ यांनी मंजूर केलेल्या रेशनिंग कार्ड व रेशनिंग दुकानदारांना वाटप केलेले धान्य परमिट अनधिकृत असणार आहे का अधिकृत या बाबतीत वरिष्ठांकडून कारवाईची अत्यंत गरज आहे. क्रमशः ( पुढील बातमीत महा ई सेवा वाल्यांची पिळवणूक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here