कोंढव्यात झैनुददीन उर्फ कलवा याच्यावर जीव घेणा हल्ला. कोंढव्यात माजली खळबळ

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

कोंढव्यातील झैनुददीन उर्फ कलवा भाईवर जीव घेणा हल्ला झाल्याने कोंढवा परिसरात खळबळ माजली आहे. या संदर्भात कोंढवा पोलिस ठाण्यात ५४/२०२४, भादविक ३२६,३२३,३४, महा. पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३)१३५ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद अमीत सपकाळ, वय-३४ वर्षे, रा. कमेला, कोंढवा-खुर्द याने दिली आहे. तर फिर्यादीवरून १) सनी राजु चव्हाण, वय – ३३ वर्षे, रा. सनं.६०१,समतानगर,लुल्लानगर, कोंढवा, २) अनिश राजू व्हाण उर्फ बापु,वय-३९ वर्षे, रा. सोमवार पेठ, व इतर दोन जणांना अटक केली आहे.

यातील सनी व अनिश चव्हाण यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन फिर्यादी यांचे मित्र झैनुद्दीन शेख ऊर्फ कल्लु, वय – ३२ वर्षे यास मारण्यासाठी अंगावर धावुन जात असताना, फिर्यादी हे त्यांची भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्ती केल्याचे कारणावरून इतर इसमांनी आपसात संगनमत करून, त्यांचे गल्लीतुन येवुन, त्यांचेकडील धारधार हत्यार काढुन झैनुद्दीन ऊर्फ कल्लु याचे डोक्यात तसेच हातावर मारुन, त्यास गंभीर जखमी केले.

त्यावेळी फिर्यादी व कासीम सैय्यद असे त्यास वाचविण्या साठी मध्ये गेले असता, त्यांना लाथा-बुक्यांनी मारहान करून दुखापत केली आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वैभव सोनवणे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here