पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) पुणे शहरातील रेशनिंग कार्यालयात आय.एस.ओ मानांकनाची जय्यत तयारी सुरू होती. त्यासाठी रंगरंगोटी पासून अभिलेख दुरूस्ती पर्यंत असे अनेक कामे करण्यात आली,
त्यासाठी आय एस ओ मानांकनाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडून अन्न धान्य ह”ज” परिमंडळ अधिकारी गजानन देशमुख यांना सर्वोत्कृष्ट अधिकारी पुरस्कार महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने प्रदान करण्यात आला आहे.
त्या कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख,
पुरवठा उपायुक्त डॉ त्रिगूण कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.