उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांचे केले होते कौतुक.
मग एवढी टोकाची भूमिका घेण्याचे कारण काय?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी,पुण्यातील निगडी येथील अ”व ज” परिमंडळ अधिकाऱ्यांनी थेट राजीनामा पत्र वरिष्ठांच्या हवाले केल्याने चर्चेला उधाण आले आहे. तर डॅंशिग परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांनी एवढी टोकाची भूमिका का घेतली याची माहिती घेण्यासाठी पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधींनी पुण्यातील काही रेशनिंग कार्यालयात फेरफटका मारला असता अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
आय.एस.ओ मानांकनासाठी तावरे यांचे अ”ज” परिमंडळ कार्यालयाची निवड करण्यात आली होती. त्यासाठी तावरे यांनी जिवाचे रान करून रात्रंदिवस मेहनत घेऊन काम केले, त्याची दखल खासदार श्रीरंग बारणे व आमदारांनी आणि नगरसेवकांनी घेत दिनेश तावरे यांचे कौतुक देखील केले होते.
तर १ मे महाराष्ट्र दिनी राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी तावरे यांचे कामाचे व्हिडिओ पाहून खुर्चीवरून उभे राहून दिनेश तावरे यांचे कौतुकही केले.
परंतु आय.एस.ओ ( ISO mankan ) मानांकनाच्या प्रशस्तीपत्र देण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा दुसऱ्या परिमंडळ कार्यालयाला अचानक पणे आय.एस.ओ मानांकन देण्यात आल्याने सदरील बाब दिनेश तावरे यांच्या जिव्हारी लागली, दिवसरात्र एक करून एवढी मेहनत घेऊनही त्यावर पाणी फेरल्याने व तावरे यांचे नाव असतानाही त्यांना डावलल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.
तावरे यांच्या खुर्चीवर काही परिमंडळ अधिकाऱ्यांची नजर असल्यानेच तावरे यांना वारंवार बलीचा बकरा बनविण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
ज्यांचे काहिच कामे नाही अश्यांना पारितोषिक देत, काम करणाऱ्यांना डावलले जात आहे. अशी चर्चा परिमंडळ कार्यालयात सुरू आहे. अधिक माहितीसाठी परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.