कोरोनाचे कडक निर्बंध असतानाही भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालतोय बेली डान्स!

0
Spread the love

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या नाकाखाली रात्री उशिरापर्यंत पब चालू?

हॉटेल K72 चा मालक काशिदला आशिर्वाद नेमकं कोणाचा.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, एकीकडे राज्यात कोरोना माहामारीने पुन्हा डोके वर काढले असून दिवसेंदिवस कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत असल्याने महाराष्ट्र राज्य सरकारला कडक निर्बंध घालवे लागले आहेत. व त्यासाठी कडक उपाययोजना केल्या जात आहेत.

तसेच आता एकीकडे विना मास्क फिरणा-यांवर वर देखील दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली असून दुसऱ्याकडे पुणे शहरातील पब मध्ये कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहे.

तरी देखील स्थानिक पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पुणे शहरात शुक्रवार-शनिवार-रविवार या तीनही दिवशी पब, हॉटेल मध्ये इव्हेंट ठेवले जात असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. असाच एक व्हिडिओ पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधींच्या हाती आला आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिल्लार वाडी येथे हॉटेल K72 रात्री उशिरापर्यंत चालू असून त्या हॉटेलात सर्वच्या सर्व नियम धाब्यावर बसविले जात असताना भारती विद्यापीठ पोलीसांचे दुर्लक्ष होताना पाहिला मिळाले आहे. हॉटेल K72 मध्ये रात्री बेली डान्स व हुक्का पार्टीचे आयोजन करण्यात आले व ते मोठ्या थाटामाटात पार्टी देखील झाली.

परंतु भारती विद्यापीठ पोलीसांना या बाबतीत खरंच कल्पना नव्हती का? का “वसूलीवाल्यांची” मेहरबानीने व आशिर्वादाने पार्टी पार पडली, पुणे सिटी टाईम्सच्या हाती आलेल्या व्हिडिओ मध्ये पार्टीत कोणीही तोंडावर मास्क लावल्याचे दिसून येतं नाही. तर काही दिवसांपूर्वी हॉटेल K72 मध्ये क्राईम ब्रॉंचने रेड करून हुक्का पार्लरवर कारवाई केली होती.

कारवाई करूनही पुन्हा बेली डान्स व हुक्का पार्टी जोमात होत असल्याने भारती विद्यापीठ पोलीसांच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे? हॉटेल K72 चा मालक काशिदला कोण पाठिशी घालत आहे? याला वसुली वाल्यांचा पाठिंबा आहे का वरिष्ठांचा? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

सर्व सामान्यांवर कारवाईचा बडगा उगारणारे पोलीस, कोरोनाचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांविरूद्ध फौजदारी कारवाई करणार का? तसेच ज्याच्या हद्दीत डान्स व हुक्का पार्टी जोमात सुरू आहे त्या वरिष्ठांवर देखील पोलीस आयुक्त कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. अधिक माहितीसाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना कोरोना झाल्यची माहिती मिळाल्यने पुढील संपर्क होऊ शकला नाही. क्रमशः

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here