कोंढवयातील अवैध गौण खनिजवर (उत्खनन) कारवाई करण्यासाठी कात्रज तलाठ्यांचे सोईस्कर दुर्लक्ष?
१५ दिवसांत २ पंचनामे पुरेसे असल्याचे तलाठी अर्चना वनवे यांचे वक्तव्य.
पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, पुण्यातील उपनगर परिसरातील कोंढवा भागात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू आहे. बांधकाम करताना पायाभरणी करण्यासाठी जमिन उत्खनन करावीच लागते.तर उत्खनन करायचे म्हटले तर तहसिल कार्यालय ( हवेली) कडून परवानगी घ्यावीच लागते, अशी परवानगी न घेता राजरोसपणे अवैध गौण खनिज सुरू असल्याची बातमी पुणे सिटी टाईम्सने प्रसिद्ध केली होती.
व तहसिलदार तृप्ती कोलते यांची भेट घेऊन समक्ष स्वतः भेट देण्यासाची मागणी केली होती. त्यानंतर तहसिलदारांनी कात्रज तलाठी कार्यालयात जाऊन पाहणी केली होती. परंतु प्रत्यक्षात कोंढवा भागात पाहणी दौरा आजपर्यंत झालाच नाही.त्या दरम्यान कात्रज तलाठी अर्चना वनवे-फुंदे यांनी पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधींशी संपर्क करून कोंढवा मध्ये कुठे कुठे गौण खनिज चालू आहे ते दाखविण्याची विनंती केली होती.
दुसऱ्या दिवशी २५ नोव्हेंबर रोजी पाहणी दरम्यान सर्वे नंबर नुसार अवैध गौण खनिज चालू असल्याचे दाखविण्यात आले होते. १) सर्वे नंबर ५० भाग्योदय नगर गल्ली नंबर १ याठिकाणी गौण खनिज करून फुटींग भरत असल्याचे दिसून आले आहे. २) सर्वे नंबर ५० भाग्योदय नगर गल्ली ३, इंडिकॅश एटीएम शेजारी व अगदी त्या समोरील बाजूस, ३) सर्वे नंबर ४६ तहा ट्रेडर्स सोसायटी शेजारी साईबाबा नगर गल्ली नंबर ९ येथे,
४) सर्वे नंबर ४६ हिस्सा नंबर ६२ दौलत अपार्टमेंट शेजारी, ५) स नं ४६ जास्मिन सोसायटी मध्ये ( शितल पेट्रोल पंपाच्या मागे), ६) सर्वे नंबर १६/अ/४/१ क्वालिटी सफायर इमारती शेजारी मॅजेस्टिक डेव्हलपर्स, अश्या ६ ठिकाणी गौण खनिज उत्खनन संदर्भात दाखवले असता बाकिच्या ठिकाणी नंतर पाहू असे म्हणून तलाठी निघून गेले.
परंतु २५ नोव्हेंबर २०२१ रोजी ते आज १५ दिवसांचा कालावधी झाला तरी अद्यापही एका ठिकाणचे पंचनामे झाले नसल्याचे दिसून आले, त्या बाबतीत तलाठी अर्चना वनवे यांना जाब विचारला असता ते म्हणाले सदरील ठिकाणी मी दोनवेळा जाऊन आले मला तेथे कोणीच भेटले नाही तर मी पंचनामा कसं करणार? आणि १५ दिवसांत २ वेळा जाऊन येणे ते माझ्यासाठी पुरेसे आहे? ते ही कोंढवा भागात जाणे म्हणजे माझ्यासाठी खुपच झाले? मी रोज त्या ठिकाणी जाऊच शकत नाही? तुम्ही नावे आणून द्या मी ७/१२ चेक करते? माझ्या हातील काम झाल्यावर मी ५ नंतर जाते? तर आणखीन ठिकाणी सुरू असलेल्या गौण खनिज संदर्भात पाहणी कधी करणार असे विचारल्यावर काहिच उत्तर त्यांच्याकडून दिले गेलेले नाहीत. तर असेच अनेक वक्तव्य अर्चना वनवे फुंदे यांनी केले आहे.
तलाठी अर्चना वनवे यांच्या अश्या वक्तव्याने समजायचं तरी काय? चोवीस तासांत पंचनामे करणे बंधनकारक असताना पंचनामे का झाले नाही? अवैध गौण खनिज उत्खनन संदर्भात लेखी तक्रारी करूनही महिनो-महिने पंचनामे का होत नाहीत? तक्रारीची वेळेतच दखल घेतली जात नसल्याने फुटींग भरून बांधकाम व्यावसायिक मोकळे होताना उघड डोळ्यांनी पाहिला मिळत आहे.
तर यात कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तहसिलदार (हवेली) तृप्ती कोलते हे सदरील कोंढवा भागात पाहणी करणार होते मग त्याचे काय झाले? अजूनही पाहणी का झाली नाही?
पाहणी करण्याबाबतील वक्तव्याचा बार फुसका निघाला का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून तलाठी वनवे यांनी अवैध गौण खनिज (उत्खनन) करणा-यांना पाठिशी घालून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी पुणेकरांकडून केली जात आहे. यावर तहसिलदार काय कारवाई करणार याकडे लक्ष टिकून राहणार आहे.