कोंढव्यातील फखरी हिल येथील वाहतूक सुरळीत. मग शितल पेट्रोल पंप ते अशोका म्युझ पर्यंत होणा-या वाहतूक कोंडीचे काय? ( Kondhwa traffic police news)
……….पुणे सिटी टाईम्स इम्पॅक्ट…….
पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, कोंढव्यातील फखरी हिल ते उड्डाण पूल पर्यंत रोजच वाहतूक जाम होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी पुणे सिटी टाईम्सकडे केली होती.
त्या तक्रारीची पाहणी करून पुणे सिटी टाईम्सने “कोंढव्यातील वाहतुकीमुळे स्थानिक नागरिक झालेले बेहाल” या सदराखाली बातमी प्रसिद्ध केली होती.
त्या बातमीची दखल घेऊन कोंढवा वाहतूक विभागाने सदरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एक वाहतूक पोलीसाची नेमणूक केली आहे.
आता ती नेमणूक तात्पुरती असणार का कायमस्वरूपी हे येणारे काळच ठरवेल, तर वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास मिळून दिल्याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी पुणे सिटी टाईम्सचे आभार व्यक्त केले आहे.