पोलिसांच्याच आशिर्वादाने सुरू आहे अवजड वाहतूक, स्थानिक नागरिकांचा आरोप?
पुणे सिटी टाईम्स (PCT) प्रतिनिधी, लोकवस्ती मध्ये दिवसाढवळ्या अवजड वाहनांना प्रवेश बंद असताना दाट वस्ती असलेल्या कोंढव्यात अवजड वाहनांचा शिरकाव होत असताना देखील कोंढवा ट्राफिक पोलीसांचे सोईस्कर दुर्लक्ष होताना दिसत आहे.

सध्या कोंढवा भागांमध्ये विविध ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. त्या ठिकाणी खडी,डबर, राडारोडा व उत्खनन केले गौण खनिज वाहतूक करण्यासाठी मोठ्या डंपरचा वापर केला जात आहे.
ते डंपर चालक अवजड डंपर घेऊन गल्ली बोळात शिरकाव करत असल्याने स्थानिक नागरिकांना जागोजागी वाहतूक जाम चा सामना करावा लागतो आहे. तासंतास वाहतूक जाम होत असताना कोंढवा ट्राफिक पोलीस मात्र पावत्या फाडण्यात मगण आहे.

कोंढवा ट्राफिक पोलीसांच्या दुर्लक्षामुळे व आशिर्वादामुळेच वाहतूक जाम होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी पुणे सिटी टाईम्सकडे केली आहे.
अवजड वाहनांमुळे एखादे अपघात झाले तर याला जबाबदार कोण? तसेच कोंढवा ट्राफिक पोलीसांचे वाहतूकी संदर्भात नियोजन शुन्य कारभार चालू आहे. कोंढवा मध्ये जिते जाईल तिथे वाहतूक जाम चा सामना स्थानिक नागरिकांनी करावा लागतो आहे.
अवजड वाहन धारकांडून वसूलीवाल्यांची वसूली होत असल्याने कारवाई करण्यास कुचराई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. क्रमशः ( पुढील बातमीत, कोंढव्यात वाहतूक जाम चा उपद्रव!)