” नागरिक अधिकार मंचाच्या आंदोलनाला यश “
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, कोंढवा प्रभाग क्रमांक २६ कौसर बाग लाईफलाईन हॉस्पिटल समोरील रस्त्याचा काम अखेर सुरू करण्यात आले आहे. सदरील काम अर्धवट करून पालिकेतील अधिकारी गायब झाल्याने त्याठिकाणी अपघात होत असल्याने कोंढवा येथील नागरिक अधिकार मंचाचे अध्यक्ष समिर शफि पठाण यांनी मनपा विरोधात आंदोलन केले होते.
सदरील रस्ता ३५ दिवसांपासून अर्धवट अवस्थेत बंद पडला होता सदर ठिकाणी नागरिक अधिकार मंचच्या अध्यक्ष समीर शफी पठाण यांच्या नेतूरत्वा खाली नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले होते.
तसेच येत्या ८ दिवसात जर रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास महापालिकेवर भव्य धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही समिर शफि पठाण यांनी दिला होता.आंदोलनाची दखल घेत पुणे मनपा कडून सदर ठिकाणी अर्धवट रस्त्याचे काम परत चालू करण्यात आले,
स्थानिक राहिवशींच्या वतीने नागरिक अधिकार मंचचे आभार मानले त्यावेळेस नागरिक अधिकार मंचचे अध्यक्ष समीर शफी पठाण म्हणाले नागरी प्रश्न सोडवण्यासाठी नागरिक अधिकार मंच कटिबद्ध आहे.
कोंढवा कौसर बाग येथील दोन डीपी रोडला जोडणारा हा रस्ता आहे. सदर ठिकाणी जास्त प्रमाणावर रहदारी असते रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास वाहतूक कोंडी पासून देखील नागरिकांना सुटका मिळेल असे पठाण यांनी सांगितले आहे.