बनवाबनवी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
कोढवा खुर्द सर्वे नं ५५/८/३ व ५५/९/१ भाग्योदय नगर या मिळकती मध्ये बेकायदेशीर बांधकाम चालू असून बांधकाम करण्यापूर्वी सदरील धनाजी बांधकाम व्यवसायिकाने झाडांची कत्तल तर केलीच होती. तर बेकायदेशीररित्या डोंगर पोखरून शासनाचा महसूल देखील बुडवल्याची बातमी पुणे सिटी टाईम्सने प्रसिद्ध केली.
त्या बातमीच्या अनुषंगाने आणखीन एक माहिती सुत्रांकडून हाती आली आहे. सदरील बांधकाम व्यावसायिकाने भाग्योदय नगर गल्ली नं १३ मधील वीज मिटर हा बेकायदेशीर बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी म्हणजे गल्ली नं १५ मध्ये वापरत असल्याचा पुरावा समोर आला आहे.
या बाबतीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता ते म्हणाले की सदरील बाब गंभीर असून ते मिटर परवानगी शिवाय हलवताच येत नाही. मग अश्या बनवाबनवी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.