कोंढवा नागरिक अधिकार मंचाने केले आंदोलन
पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी,कोंढवा येथील पारगेनगर आणि पोकळे मळ्यामधील महापालिकेचा अधिकृत वीस मीटर डीपी रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात यावा,
या मागणीसाठी कोंढवा नागरिक अधिकार मंचच्या वतीने मोठ्ठे आंदोलन करण्यात आले.सर्वे नंबर ३८ व ३७ पारगेनगर या ठिकाणी अधिकृत वीस मीटर डीपी रस्ता आहे. मात्र, येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून पत्रे लावून हा रस्ता बंद करण्यात आला आहे.
महापालिकेने २००४ साली डीपी रस्ता केला आहे. रस्ता पालिकेच्या ताब्यात असला तरी पालिकेने तो नागरिकांसाठी खुला केला नाही. त्यामुळे परिसरात वाहतूककोंडी होते. डीपीतील रस्ता खुला केल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल,
आणि कौसरबाग बाह्यवळण रस्ता खुला न केल्यास कोंढवा बुद्रुकपर्यंतचा मार्गावर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.
महापालिकेकडे वारंवार विनंती करूनदेखील रस्ता खुला करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप नागरिक अधिकार मंचाचे अध्यक्ष समिर शफि पठाण यांनी दिला आहे. सदरील आंदोलनात सोसायटीच्या लोकांनी मोठ्याप्रमाणात भाग घेतला होता.




