पुणे रेल्वे स्टेशनजवळ भररस्त्यात चालतोय मटका जुगाराचा खेळ, पोलिसांचे दुर्लक्ष का?

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पोलिस आयुक्तांनी दोन नंबरचे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले असले तरी आज आयुक्तांच्याच आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

” मटक्याची चिठ्ठी “

ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे चालू आहे त्या अवैध धंद्याना पोलिस ठाण्याच्या “वसूली वाल्यांचीच” मेहरबानी असल्याचे बोलले जात आहे.

पुणे रेल्वे स्टेशन येथील एसटी स्टँड शेजारील फुटपाथवर बिनधास्तपणे मटका जुगार चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. फुटपाथवरच सदरील मटक्याचा धंदा चालू असल्याने नागरिकांना फुटपाथ सोडून चालावं लागत आहे.

ज्या ठिकाणी अवैध मटका जुगार चालू आहे त्याच हाकेच्या अंतरावर रेल्वे स्टेशन पोलिस चौकी असतानाही पोलिसांच्या निदर्शनास आले कसे नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वर्दळीच्या ठिकाणी राजरोसपणे जुगार अड्डा चालू असून त्या ठिकाणी एसटी स्टँड,नागरिक सुविधा केंद्र, रेशनिंग कार्यालय व इतर शासकीय असताना येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.


विषेश म्हणजे त्या ठिकाणी गर्दी उसळत असल्याने काही नागरिकांना वाटतंय की रेल्वेच्या टिकीट मिळताहेत की काय? परंतु तेथे विचारणा केल्यावर माहित पडते तेथे मटक्याच्या अवैध जुगार अड्डा चालू आहे.

परंतु कोणाच्या “मेहरबानी” ने सदरील धंदा चालू आहे त्याच्यावर पोलिस आयुक्त कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. तर पुणे सिटी टाईम्स लवकरच याचा उलगडा करणार आहे. क्रमशः

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here