पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
दान जमा करून हजला जाण्यासाठी जमा करत असलेल्या पैश्यांवर चोरांनी डल्ला मारत सदरील रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका ८२ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे खडकी येथे राहिला असून ते बिगारीकाम करतात, भवानी पेठेतील बक्कर कसाब मस्जिदचे मेन गेट समोर फिर्यादी हे उभे राहुन हज यात्रेला जाण्यासाठी तसेच गोर-गरिबांना मदत करण्यासाठी लोकांकडुन दान गोळा करत असताना,अनोळखी इसमाने फिर्यादी यांना मस्जिद साठी चंदा द्यावयाचा आहे.
तुमच्याकडे किती रुपये आहेत मला दाखवा व द्या, त्याच्या दुप्पट पैसे मी तुम्हाला देतो असे भासवुन फिर्यादी यांची दिशाभुल व हातचलाखी करुन, फिर्यादी हे मोजत असलेली रक्कम रुपये १९ हजार रूपये रोख रक्कम घेवुन, दुचाकीवर बसुन भरधाव वेगाने जुना मोटर स्टॅण्डच्या दिशेने पसार झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रणदिवे करीत आहेत.