बक्षिसाच्या नावाखाली पोलिसांची थट्टा, गुन्ह्याचा तपास लावणा-या पोलिसाला फक्त १०० रूपये बक्षिस तर ड्रायव्हरला २१ हजार रुपये!

0
Spread the love

पोलिस दलात नाराजगीचे सुर.जीव धोक्यात घालणा-यांना फक्त शंभर रूपये,ही शाबासकी आहे की थट्टा?

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पोलिसांनीच पोलिसांची बक्षिसाखाली थट्टा केल्याची घटना ही दुसरीकडे कुठे नव्हे तर पुणे शहर पोलिस आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारीत येणा-या पोलिस उपायुक्त कार्यालयात घडली आहे. तर यामुळे पोलिसांमध्ये वादंग पेटण्याची चिन्ह आहेत. वाहनचालकाला २१ हजारांचे बक्षिस देण्यात आले आहे.

तर गुन्ह्याचा तपास लावणा-या पोलिसाला फक्त आणि फक्त १०० रूपये बक्षिस देण्यात आल्याने पोलिस दलात नाराजीचे सूर उमटत आहे. वाहन चालकाचे काम आहे वाहन चालवणे?परंतु जीव धोक्यात घालून गुन्ह्याचा तपास लावणा-या पोलिसाला फक्त शंभर रूपये दिल्याने वरिष्ठांनी आपल्या जवळच्या चेल्या चपाटयांची मर्जी राखल्याचे बोलले जात आहे.

हे प्रकरण बाहेर आल्याने वरिष्ठांची काहींवर कृपादृष्टी असल्याचे बोलले जात आहे. रिवॉर्ड यादी जाहीर झालेली असून त्यात गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिसांना फक्त शंभर रूपये रिवॉर्ड देण्यात आलंय. पोलिस उपायुक्त परिमंडळ ३, पौर्णिमा गायकवाड यांच्या मर्जीतीले चार कर्मचाऱ्यांना दहा वेळा हजार, हजार रुपये देण्यात आले आहे.

मात्र त्यांच्याच हद्दीतील कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करूनही त्यांना रिवॉर्ड देण्यात आलेला नाही.तर पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे ( गुन्हे) यांनी जी यादी जाहीर केलेली आहे त्यात फक्त शंभर रूपये बक्षिस दिले आहे.विशेष म्हणजे मर्जीतल्या लोकांवर वरिष्ठ कृपादृष्टी करतात हे अनेकदा समोर आले आहे. पोलिसांनीच पोलिसांसोबत दुजाभाव केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

“पोलिस उपायुक्त गायकवाड यांनी त्यांच्याकडे गार्ड आणि ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या बोरकर,शेख,जाधव व आणखीन एकाला एकाच यादीत २६ रिवॉरड दिले आहेत. त्याची प्रत्येकी रक्कम आहे हजार रुपये दिलेले आहेत. परंतु असे दुसऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला दिलेले नाहीत. मग हे उत्तम काम करणारे फक्त चारच जण आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here