पुणे मनपाने तात्काळ चालू बांधकाम पाडण्याची मागणी.
वीज मिटर कट करून मागितला खुलासा, परंतु आजही बेकायदेशीर वीज कनेक्शन मारून बार कटींग?
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
कोंढवा खुर्द भाग्योदय नगर सर्वे नं ५५/८/३ व ५५/९/१ ही मिळकत तनवीर शमशेर सय्यद यांनी खरेदी केली आहे. सदरील सर्वे नं ५५/८/३ मधील प्लॉट हा ४ गुंठे व ५५/९/१ हा प्लॉट ८ गुंठ्याचे माझ डेवलपर्स तर्फे तनवीर सय्यद यांनी खरेदी करून सदरील प्लॉटवर बेकायदेशीरपणे बांधकाम करण्यासाठी भाजपा कार्यकर्ता व रियाज शेख व इतरांना दिले आहे.
सदरील ठिकाणी बांधकाम करण्यासाठी झाडांची कत्तल व डोंगर पोखरून बेकायदेशीररित्या बांधकाम केले जात आहे. बांधकाम करणाऱ्या ठिकाणी पुणे महानगर पालिकेने २४ तासांत बेकायदेशीर बांधकाम थांबविण्याची नोटीस बांधकाम विकास विभाग झोन २ ने काढली होती.
नोटीस प्राप्त होताच सदरील बांधकाम थांबविणे क्रमप्राप्त होतो. परंतु बेकायदेशीर बांधकाम थांबवल्याने आपल्या अस्तित्वाला धक्का लागेल? या विचाराने बेकायदेशीर बांधकाम थांबविण्याच्या नोटीसाला केराची टोपली दाखवून बिनदिक्कतपणे १२ गुंठ्यात सर्व नियम डावलून बेकायदेशीरपणे बांधकाम करण्यात येत आहे. आता पुणे महानगर पालिकेने फक्त कागदी घोडे न नावचाता थेट कारवाई करून सदरील बांधकाम भुईसपाट करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
” वीज मिटर कट करून मागितला खुलासा, परंतु आजही बेकायदेशीर वीज कनेक्शन मारून बार कटींग? ” व्हिडिओ
सदरील ठिकाणी गल्ली नं १३ मधील वीज मिटर गल्ली नं १५ येथे वापरल्याची बातमी पुणे सिटी टाईम्सने प्रसिद्ध केल्यानंतर महावितरण कडून वीज मिटर कट करून खुलासा मागितला गेला. परंतु त्या खुलासा करण्यापूर्वीच आजही सदरील ठिकाणी बेकायदेशीरपणे वीज वापरून बार कटींग करत असल्याचे पुरावे हाती आले आहे. याचाच अर्थ बांधकाम व्यावसायिक महावितरणाला देखील खो.. देत आहे.