पुण्यातील कोंढव्यात बेकायदेशीर बांधकामावर पालिकेचा हातोडा, भाग्योदय नगर मधील ७ मजली इमारतीवर पालिकेची कारवाई.

0
Spread the love

कोंढव्यात पालिकेची कारवाई सुरू झाल्याने बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांच्या गोठ्यात खळबळ.

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

कोंढवा मध्ये बांधकामांचे इमले उभे राहत असल्याने पालिका प्रशासन आता ॲक्शन मोडवर आली आहे. पुणे महानगर पालिकेने मागच्या आठवड्यात मोठी कारवाई केल्यानंतर बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांच्या गोठ्यात खळबळ उडाली आहे. पालिकेने कारवाईचा निर्णय घेतला असल्याने त्यांचे कौतुक देखील होत आहे.

आज ४ ऑगस्ट रोजी कोंढवा खुर्द भाग्योदय नगर गल्ली नं ३० येथे जफर बोगदी यांचे ७ मजली बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने पुणे महानगर पालिका बांधकाम विकास विभाग झोन २ कडून १५०० स्क्वेअर फुट बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे.

तर त्या पुढील आणखीन एक इमारतीवर पालिकेने हातोडा चालवला आहे. सदरील कारवाई नंतर बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. तर नागरिकांनी सदरील बांधकामामध्ये घरे खरेदी करू नये व बेकायदेशीर बांधकाम घरेदी करून बळी पडू नये असे आव्हान पालिकेने नागरिकांना केले आहे.

” पालिकेच्या कारवाई नंतर धोकादायक स्लॅब “

पुणे महानगरपालिकेने स्लॅबला होल मारल्यानंतर सदरील स्लॅब हे कमजोर होत असल्याने सदर ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून नागरिकांनी सदरील पालिकेने केलेल्या कारवाईच्या ठिकाणी फ्लॅट खरेदी करू नये असे आव्हान पुणे सिटी टाइम्सने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here