कोंढव्यात बेकायदेशीर बांधकाम अन् मुनाफ शेख या मियां भाईंची डेअरिंग?
पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
कोंढवा मध्ये सध्या बेकायदेशीर बांधकामांवर पालिका धडाधड कारवाईचा धडाका लावला असताना काही बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.तर काहींनी कामे बंद करून मिस्टर इंडिया सारखे गायब झाले आहे.परंतु काही मियां भाईंची डेअरिंग पाह्यला मिळत आहे.
कोंढवा खुर्द भाग्योदय नगर व मिठानगर मध्ये बेकायदेशीर बांधकाम काही थांबायला तयार नाही.पालिकेची जोरदार कारवाई सुरू असल्याने कारवाई संदर्भात बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांच्या हालचाली पाहण्यासाठी पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधींनी पाहणी केली असता पालिकेच्या कारवाईला आम्ही भिक घालत नाही असे काही ठिकाणी बांधकाम करणाऱ्या धनाजी रावांनी दाखवून दिले आहे.
१ ) सर्वे नंबर ५१/२ब/ २७ अल्फला मस्जिदच्या पुढे कोपऱ्यात एक इमारतीचे ७ मजले बांधकाम चालू आहे.सदरील ठिकाणी १ गुंठ्यात काम करून नागरिकांचे जीव धोक्यात घालून व पालिकेचा महसूल बुडवून स्वतः मलाई कोफ्ता खात आहे.

२ ) सर्वे नंबर ६२/४ कोंढवा खुर्द मिठानगर गल्ली नं ७ शमशुददीन ड्रिम हॉरिजन स्कूलच्या पुढे बेकायदेशीरपणे बांधकाम चालू आहे.सदरील बांधकाम बेकायदेशीर असतानाही त्याला कायदेशीर असल्याचे दाखवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे.विषेश म्हणजे पालिकेच्या कारवाईला आम्ही मियां भाई घाबरत नसून आमच्या डोक्यावर राजकीय पक्षांचा हात असल्याचे दाखवून दिले आहे.

या सर्व बेकायदेशीर बांधकामांना जमीनदोस्त करून पालिका कोणाला घाबरत नाही हे पालिका अधिकाऱ्यांनी दाखवून द्यावे असे नागरिकांचे म्हणणे आहे.






