पोलिस बंदोबस्त उपलब्ध न झाल्याने थंडावलेली कारवाई पुढील आठवड्यापासून पुन्हा सुरु केली जाणार
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
आज पुणे शहरात बेकायदेशीर बांधकामे फोफावली असून त्यात टेरेसवरील हॉटेलांची देखील संख्या जास्त आहे. पुणे महानगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे आज रूफटॉप हॉटेलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर आगीची घटना घडल्यावरच जागी झालेली पुणे महानगर पालिकेने ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.
पोलिस बंदोबस्त उपलब्ध न झाल्याने थंडावलेली कारवाई पुढील आठवड्या पासून पुन्हा सुरु केली जाणार आहे.काही महीन्यापुर्वी बाणेर येथे एका इमारतीच्या टेरेसवर बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या हॉटेलला आग लागली होती. यानंतर या टेरेसवरील हॉटेल्सचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभुमीवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने सर्वेक्षण केले होते.
या सर्वेक्षणात आढळून आलेल्या बेकायदेशीर हॉटेल्स चालकांना नोटीस पाठविली गेली होती. त्यांना सदर बेकायदेशीर बांधकाम उतरवुन घेण्याचे आदेशही या नोटीसमार्फत दिले गेले होते. काहींनी कारवाईच्या भितीने बांधकामे उतरविली. तर काहींनी बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरुच ठेवला होता.
पाठविलेल्या नोटीस नंतरही हॉटेल व्यवसाय सुरु ठेवणाऱ्या ३३ हॉटेल्सवर कारवाई केली गेली होती. या हॉटेल्सवर कारवाई करून तेथील अनधिकृत शेड, बांधकामे पाडली गेली होती. ही कारवाई केल्यानंतर काही जणांनी पुन्हा एकदा बांधकाम करून व्यवसाय सुरू केला होता. या प्रकारांना रोखण्यासाठी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला होता.त्यानंतरही बांधकाम करून पुन्हा व्यवसाय सुरु करणाऱ्या आठ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला गेला आहे.