रूफटॉप ( टेरेसवर) हॉटेलला परवानगी नसतानाही पुणे महानगर पालिकेकडून दुर्लक्ष का?
मुंबई सारखीच पुणे महानगर पालिका मोठी जिवीत हानी होण्याची वाट बघत आहे का?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
कोंढव्यातील लुल्लानगर चौकातील मार्व्हल विस्टा या हॉटेल मध्ये नुकताच आगीची घटना घडली आहे.कोंढाव्यातील लुल्लानगरमधील मार्व्हल विस्टा
इमारतीतील सातव्या मजल्यावरील हॉटेलला लागलेल्या आगीत हॉटेल
जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सध्या सुरू आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. आगीत कोणीही जखमी नसल्याची माहिती अग्निशमन दलाने यावेळी दिली.
रूफटॉप वर बेकायदेशीरपणे हॉटेल चालू असताना व त्या विरोधात लेखी तक्रारी असतानाही पुणे महानगर पालिकेतील यंत्रणेचे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे. तक्रारींकडे दुर्लक्ष का केले जाते? यात अधिका-यांना फुकट बिर्याणी तर मिळत नाही ना? असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.
आतातरी पुणे महानगर पालिका आयुक्त कोंढाव्यातील टेरेस वरील बेकायदेशीरपणे चालणाऱ्या हॉटेलवर कारवाई करणार का? असा प्रश्न कोंढवाकर विचारत आहे.