अन्न धान्य ग” परिमंडळ अधिकाऱ्यांनी दिले आदेश.
"पुणे सिटी टाईम्स इम्पॅक्ट न्यूज"
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान,
बनावट शिधापत्रिक तयार करून बोगस सह्या शिक्केचा वापर करून एकाची फसवणूक केल्याप्रकरणी अन्नधान्य ग” परिमंडळ अधिकारी लक्ष्मण माने यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
हकीकत अशी की नाना पेठेतील “राणी” नावाच्या एका महिला एंजटाने अन्सारी नावाच्या व्यक्तीला गेल्या दोन महिन्यांपूर्वी सन २०१३ ची पिवळी शिधापत्रिका बनवून दिली होती.
त्या संदर्भात प्रथम “पुणे सिटी टाईम्सने” बातमी प्रसिद्ध केली होती. ती बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अन्सारी यांनी अन्नधान्य ग परिमंडळ अधिकाऱ्यांना समक्ष भेटून बनावट सही शिक्केचा वापर करून ३५०० रूपयात बनावट शिधापत्रिका विकून फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती.
ती बातमी काल पुणे सिटी टाईम्सने प्रसिद्ध केल्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागे होत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
तर पी.पी.माळी यांना चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायसह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आज पर्यंत किती लोकांची फसवणूक केली असेल? याची चौकशी होणार का? तसेच निष्पक्षपणे कारवाईची मागणी केली जात आहे.
“अन्नधान्य ग”परिमंडळ कार्यालयाकडील पत्रातील खुलासा”
जी शिधापत्रिका अन्सारीचया नावाने रजिस्टर मध्ये नोंद आहे त्याची प्रत मागण्यात आली होती. त्या पत्रावर अन्नधान्य ग” परिमंडळ अधिकाऱ्यांनी खुलासा करत सांगितले की ह”८० या स्वस्त धान्य दुकानदाराकडे पिवळे शिधापत्रिकाधारक नसल्यामुळे सदर रजिस्टर उपलब्ध करून देता येत नाही.