पुणे शहर पोलिस आयुक्तांचा दणका; ७ पोलिस निलंबित केल्याने पोलिस दलात उडाली खळबळ

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

सिंगम चित्रपटातील दृश्य आठवणीत आले आहे. आता माजी सटकली एका एकाची वाट लागणार? पुणे शहराचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी निलंबनाचा धडाका लावल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. शासकीय कामात हलगर्जीपणा आता पोलिसांना भोवत आहे. हलगर्जीपणा केल्याप्रकरणी २ पोलिस निरीक्षकासह १ सहाय्यक पोलिस निरीक्षक २ पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित केले आहेत.

सहकारनगर पालिस ठाणेच्या हद्दीमध्ये तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या . पोलिस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या ४ अदखलपात्र गुन्हे व्यवस्थितरित्या न हाताळल्यामुळे पोलिस ठाणेच्या तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह निलंबीत केले आहे.

१) वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर, २) पोलिस निरीक्षक ( गुन्हे ) मनोज एकनाथ शेंडगे, ३) सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर विठ्ठल शेंडे, ४) पोलिस उपनिरीक्षक हसन मकबुल मुलाणी, ५) उपनिरीक्षक मारूती गोविंद वाघमारे,

६) पोलिस हवालदार संदीप जयराम पोटकुले, ७) पोलिस हवालदार विनायक दत्तात्रय जांभळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.कर्तव्यात कसूर करणाऱ्या तसेच जबाबदारी पार न पाडणाऱ्यांवर आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई केली जाणार असल्याचे एका प्रकारे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे .त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here