रमजान भाईचे बेकायदेशीर बांधकाम अन् पालिकेच्या महसूलावर डल्ला?
पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी .
कोंढवा बुद्रुक मधील गल्ली नंबर ५ मध्ये भलीमोठी इमारत उभी राहिली असून पालिकेचे अधिकारी कुंभकर्णा सारखे झोपी गेले आहेत. पुणे महानगर पालिकेचा महसूल बुडवून स्वतः खिसे भरणाऱ्यांवर आता कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

बेकायदेशीर बांधकाम करून नागरिकांचे जीव धोक्यात घालून मलीदा लाटला जात आहे. काकडे वस्ती गल्ली नं ५ मध्ये रमजान भाईचे बेकायदेशीर बांधकाम झाले असून ५ मजली इमारत उभी राहिली आहे.

मध्यंतरी या बेकायदेशीर बांधकामावर पालिकेने कारवाई केली होती.परंतु कारवाई होऊनही पुन्हा बांधकाम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. पालिकेतून माहिती घेतली असता सदरील बांधकामावर उद्या कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
” बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन केल्याची माहिती “
सदरील बांधकाम करताना अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. सदरील ठिकाणी बांधकाम करताना नियमानुसार शासकीय फी भरून तहसीलदारांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक असताना सदरील बांधकाम करणाऱ्याने कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे.



