पुणे ; बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या सारखी पुण्यात पुनरावृत्ती होण्याची शक्यता? हिंजवडी पोलिसांची अळीमीळी गुपचीळी.. माजी उपसरपंच राहुल जांभूळकर यांचे गंभीर आरोप.

0
Spread the love

भु-माफियांकडून जीवे मारण्याची धमकी? तर पोलिस म्हणतात घ्या मिटवून.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात चालयं तरी काय❓

उपसरपंच राहुल जांभूळकर यांचा परिवार दहशतीखाली.

महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात शेतकरी भूमिहीन? गुन्हे दाखल करण्याची मागणी.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात चालयं तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गुन्हेगारी वाढता वाढता वाढत असल्याने पोलिस मात्र बघ्याची भुमिका बजावत आहे. पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात गुन्हेगार व बिल्डर आणि पोलीस मिळवून एका शेतकऱ्याच्या जीवावर उदार झाले आहे.

हकीकत अशी की, हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर मोक्याच्या ठिकाणी, राहुल अरूण जांभूळकर, प्रल्हाद विठ्ठल जांभूळकर, विश्वनाथ विठ्ठल जांभूळकर यांची सर्वे नंबर २५८/४/ब, ही समाईक क्षेत्र जमीन त्यांच्या ताब्यात असताना, काही भु-माफियांनी सदरील जागेवर असलेली १३ दुकाने जमीनदोस्त केली.

तर त्यातील वीज मिटर चोरून नेले. आणि सदरील सर्वे नंबर मधील जाग्यात शिरण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीही राहुल जांभूळकर यांच्या परिवाला सदरील जागा विकत मागण्यात आली होती. परंतु ती जागा वडिलोपार्जित असल्याने विक्री करायची नव्हती. त्यानंतर मे. प्राईड प्रॉपर्टी डेव्हलपर्स यांनी पुन्हा त्या ६४ गुंठ्याच्या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न जांभूळकर यांच्या परिवाराने सन २०२२ साली हाणून पाडला व पोलिसात तक्रार झाल्यानंतर, पोलिस दरबारी लेखी पत्र देऊन सदरील जागा आमची नाही म्हणत “प्राईड प्रॉपर्टी डेव्हलपर्सने” खुलासा पत्र देऊन माघार घेतली होती.

परंतु त्या मोक्याच्या जागेवर आजही नजर ठेवून बसले होते. आणि त्या प्राईड प्रॉपर्टी डेव्हलपर्स चे अरविंद जैन, श्रवण देवकीनंद अगरवाल, विनोद गांधी, जालिंदर कृष्ण जांभूळकर, सौ. मंदाकिनी बाबासाहेब साखरे, भुषण प्रभाकर बोडके, संदीपान आसेराव शिंदे, अमित रघुनाथ मोरे, संदीप वसंत बोडके, बाबासाहेब चंद्रकांत साखरे यांनी सदरील जागेत २९ नोव्हेंबर २०२४ रोजी घुसखोरी केली.

या संदर्भात लगेचच राहुल जांभूळकर व त्यांच्या परिवाराने हिंजवडी पोलिस ठाणे गाठले. परंतु हिंजवडी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्याकडे तक्रार केली.सदरील तक्रारीवर थोरात यांनी दुर्लक्ष केल्याने, जांभूळकर यांनी पुन्हा तक्रार केल्याने तपास क्राईम पोलिस निरीक्षक घाडगे यांच्याकडे देण्यात आला. परंतु अद्यापही सदरील भु-माफियांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप शेतकरी राहुल जांभूळकर यांनी केला आहे.

तर ते म्हणाले जेव्हा आम्ही तक्रार करायला गेलो तेव्हा पीआय थोरात यांनी पैसे घेऊन मोकळे व्हा. असा दम भरल्याचे सांगितले. तर एसीपी कुरहाडे ह्यांनी देखील तक्रार अर्जाची दखल घेतली नाही. याचाच अर्थ सदरील पोलिस खाते व आख्खे हिंजवडी पोलिस ठाणे मॅनेज झाल्याचा गंभीर आरोप जांभूळकर यांनी केला आहे. ऐवढे मोठे प्रकरण असताना पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, एसीपी कुरहाडे, पीआय थोरात यांनी दखल का घेतली नाही?

जांभूळकर यांचा मुडदा पडण्याची वाट पाहत आहेत का? बीड मधील संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजेच असताना हिंजवडी पोलिस अधिकारी या वादाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे, पोलिस खात्याची आब्रु वेशीवर टांगणे होय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन तातडीने दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व आम्हाला भु-माफियांकडून भूमिहीन होण्यापासून वाचवावे अशी मागणी राहुल जांभूळकर व त्यांच्या परिवाराने केली आहे. क्रमश:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here