प्रशासन सुस्त, नागरिक झाले बेहाल.
खरंच इष्टांक संपला आहे का? अधिकाऱ्यांची बनवाबनवी?
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुणे शहरातील अन्न धान्य वितरण कार्यालयाला जोडणाऱ्या ११ परिमंडळ कार्यालयाचा विस्तार खुप वाढला असून, परिमंडळ कार्यालयात नागरिकांची रोजचीच वर्दळ असते. नवीन शिधापत्रिका बनविल्यानंतर किंवा अपडेट केल्या नंतर गरजूंना अन्न धान्य दिले जाते. परंतु आता गेल्या काही महिन्यांपासून नव्याने शिधापत्रिका बनविणाऱ्या नागरिकांना धान्य मिळत नसल्याने नागरिक आता धान्यापासून वंचित राहत आहेत.
पुणे शहरात ११ परिमंडळ कार्यालय आहे. सदरील परिमंडळ कार्यालयातून धान्य वितरण केले जाते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून धान्याचा कोटा संपल्याचे नागरिकांना व कार्यकर्त्यांना अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
अधिक माहिती घेतली असता, सांगण्यात आले की, शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु अद्यापही शासनाने धान्य कोटा वाढवून दिलेला नाही. खरंच धान्याचा कोटा संपला आहे का?अधिकाऱ्यांची बनवाबनवी आहे? हे लवकरच उघड होणार आहे. तर अधिकारी खरंच बोलत असतील तर, मग नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे.