कोंढव्यातील ते त्रिमूर्ती ठरले किंग मेकर..चेतन तुपेंचा गड राखण्यासाठी हाजी फिरोज शेख, रईस सुंडके, गफूर पठाण यांनी फिरवली गेम..!

0
Spread the love

सोशल मीडियावर चेतन तुपे यांना विरोध झाला असला तरी प्रत्यक्षात कोंढवाकरांनी गेम पलटली?

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

पुणे शहरातील महत्त्वाचा मानला जाणारा हडपसर विधानसभा मतदारसंघात जोरदार लढत पाहायला मिळाली. चेतन विठ्ठल तुपे हे राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्ष ( अजित पवार गट) तर प्रशांत जगताप हे ( शरदचंद्र पवार गट) निवडणूक लढवली. तर या मतदारसंघात अपक्ष उमेदवार गंगाधर बधे, राष्ट्रीय आझाद पक्षाकडून तौसिफ शेख, सोशल डेमोक्रॅटिक कडून अजहर तांबोळी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून साईनाथ बाबर होते.

या मध्ये जोरदार प्रचारात अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांनी उडी मारल्याने गेम पलटणार? अशी चर्चा ऐकायला मिळत होती. परंतु खरी लढाई ही चेतन तुपे आणि प्रशांत जगताप यांच्यातच होती.

चेतन तुपेंना निवडून आणण्यासाठी कोंढव्यातून हाजी फिरोज शेख, गफूर पठाण, रईस सुंडके यांनी जिवाचे रान केले होते. तर सदरील राजकारण तापू लागल्याने जातीचे राजकारण सुरू झाले. परंतु या त्रिमूर्तींनी विकासाचे राजकारण समोर आणल्याने बाजीच पलटली. कोंढव्यात मात्र प्रशांत जगताप यांना मात देण्यासाठी महादेव बाबर हे “गेमचेंजर” ठरले.

महादेव बाबर यांनी “महादेव बाबर ही गंगाधर है” और “गंगाधर ही शक्तीमान है” असा नारा दिला होता. महादेव बाबर यांच्या बंडखोरीचा फटका देखील प्रशांत जगताप यांना चांगलाच बसला. प्रशांत जगताप यांनी देखील फाईट जोरदार केली परंतु ते सफल झाले नाही.

आता काही महिन्यांनी महानगर पालिकेची निवडणूक लागणार आहे. यात ह्या त्रिमूर्तींना आमदार चेतन तुपे पाटील यांची मदतीने लढत लढावी लागणार आहे. चेतन तुपे यांनी आता कोंढव्यातील अतिक्रमण, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पाऊल उचलल्यास कोंढवाकरांना याचा फायदा देखील नक्कीच होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here