पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी
महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेवून विनयभंग करणा-या आरोपीला न्यायालयाकडून शिक्षा सुनावली आहे.फरासखाना पोलीस ठाणे गुरनं ११६/ २०१२ भादंवि सं कलम ३५४ प्रमाणे आरोपी ज्ञानेश्वर गुलाब तुरे वय ४५ वर्ष रा.स नं १३ सीमा सागर सोसायटी, बालाजी रेसेडन्सी, फ्लॅट नं २०३,सुखसागर नगर,कात्रज, याचेविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. पिडीत महिला विधवा असल्याने तीचे असहाय्यतेचा फायदा घेवून तीचेशी अश्लील संभाषण करून तीचा विनयभंग केलेबाबतची तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झालेला होता.
सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक आबाजी बाजीराव फुके (सध्या सेवानिवृत्त) यांनी करून आरोपीविरुध्द प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी,न्यायालय क्रमांक २,शिवाजीनगर, पुणे यांचे कोर्टात दोषारोपपत्र दाखल केलेले होते.वर नमुद केसची सुनावणी जे.एम. चौहान, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व पाचवे सहदिवाणी न्यायाधीश, न्यायालय क्रमांक २, शिवाजीनगर, पुणे यांचे समोर पुर्ण होवून दिनांक १३ मार्च २०२३ रोजी कोर्टात आरोपीविरुध्द गुन्हा शाबीत झाल्याने आरोपीस ३ महिने साधा कारावासाची व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास व दंडाचे रकमेपैकी ९ हजार रुपये फिर्यादि पिडीत महिलेस नुकसान भरपाई देणेबाबत निकाल दिलेला आहे.सदर कोर्ट केसचे कामकाज सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती वर्षा असलेकर यांनी पाहिले व त्याकामी त्यांना दादासाहेब चुडाप्पा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व मंगेश जगताप,पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस ठाणेकडील पोलिस उपनिरीक्षक गजानन शिंदे,पैरवी अधिकारी व सुनिल नाईक, कोर्ट अंमलदार यांनी मदत केलेली आहे.