वसुली वाले जोमात तर नागरिकांना वेळ आली जायची कोमात?
अहो समर्थ वाहतूक पोलिस गर्भवती महिलांना,लहान मुलांना व ज्येष्ठांना चालण्यासाठी फूटपाथ उपलब्ध करून देता का फुटपाथ.
पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी
एकीकडे वाहतूक पोलिसांनी कारवाईचा फास आवडला असुन रस्त्यावर जागोजागी वाहतूक पोलिस घोळक्याने थांबून शिकार शोध आहेत. तर समर्थ वाहतूक शाखेतील पोलिस फक्त ठाण्याच्या बाहेर थांबून कारवाई करत असल्याचे निदर्शनास आले आहे. रास्ता पेठेत दुचाकी विक्रेत्यांनी दुकाने रस्त्यावर थाटली असून, रस्त्यावरच दुचाकी पार्क केल्याने रोजचाच वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
विषेश महणजे दुचाकी विक्रेत्यांनी फुटपाथ देखील हायजॅक केले असून गर्भवती महिलांना,ज्येष्ठ नागरिकांना, लहान मुलांना चालायला फुटपाथ उपलब्ध नसल्याने चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.स्थानिक नागरिकांकडून माहिती घेतली असता समर्थ वाहतूक विभागातील एका वसुली वाल्याच्या मेहरबानीने सदरील दुचाकी विक्रेत्यांनी दुकाने रस्त्यावर थाटली असल्याचे काही नागरिकांनी माहिती दिली आहे.
समर्थ वाहतूक शाखेत तत्कालीन पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी चांगलीच पकड ठेवली होती.त्यामुळे रस्त्यावर दुचाकी विक्रेत्यांचे धाबे दणाणले होते. जोपर्यंत पुराणिक समर्थ वाहतूक विभागात कार्यरत होते तोपर्यंत तेथील फुटपाथ मोकळे श्वास घेत होते. परंतु पुराणिक गेल्याने आता पुन्हा दुचाकी विक्रेत्यांनी फुटपाथवर आपली दुकाने थाटली आहे.
पुणे महानगर पालिकेने लाखो रूपये खर्च करून तयार केलेले फुटपाथ हे दुचाकी विक्रेत्यांना दुचाकी लावण्यासाठी सोईस्कर झाले आहे. समर्थ वाहतूक पोलिस काका पोलिस काका आम्ही चालायचं कुठून?आहो पोलिस काका कारवाई करणार का? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
तर चालायला फुटपाथ नसल्याने रस्त्यावरून जाणाऱ्यांचा जीव धोक्यात जात आहे. आणि तो वसुलीवाला ” पाटील ” कोण त्याची चौकशी करून त्याच्यावर पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर कारवाई करणार का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. क्रमशः