साकिबच्या परिवाराची पुणे ग्रामीण अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडे तीन पाणी लेखी तक्रार दाखल.
पीआय सदाशिव शेलार यांनी म्हणणे ऐकून न घेतल्याचा आरोप.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
प्रेम प्रकरणातून गळफास घेतल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सिंहगडच्या पायथ्याच्या गोळेवाडी येथील किनारा लॉजवर १६ ऑक्टोबर २०२२ रोजी घडली होती. साकिब लतीफ इनामदार वय २५ असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव होते. तुझं आता दुसऱ्याशी लग्न जमलं आहे, तर मग मी जगून काय करू,असं म्हणत साकिबने माधुरीचे ओढणीने गळफास घेत जीवन संपवल्याने शहरात खळबळ उडाली होती.
साकिब आणि माधुरीचे गेल्या तीन वर्षापासून प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांतच प्रेयसीचा विवाह दुसऱ्यासोबत होणार होता. यावरून प्रियकर आणि प्रेयसीमध्ये वाद सुरू होते. यावरच बोलण्यासाठी ते रविवारी सकाळी १६ ऑक्टोबर ला सिंहगड पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील किनारा लॉजवर भेटले होते. त्यानंतर प्रियकर साकीब याने तुझे लग्न आता दुसऱ्याशी होणार आहे मी जगून तरी काय करू? असे म्हणत सकाळी ११ वाजताच्या सुमारास प्रेयसी समोरच तिच्याच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली होती.
त्यानंतर पोलिसांनी साकिबच्या परिवाराला साकिबच्याच आयफोन मोबाईल वरून संपर्क साधून सदरील घटनेची माहिती दिली होती. तर त्याच्या घरच्यांनी आक्षेप घेतला असता पीआय सदाशिव शेलार यांनी तुम्ही अंत विधी पार पाडल्यावर या गुन्हा दाखल करू असे आश्वासन दिले होते.
तर पोलिस अशोक तारू यांनी साकिबचा सीडीआर काढला होता. परंतु माधुरीचा सीडीआर हा १५ दिवसांचा न दाखवता फक्त एकच दिवसाचा दाखवला होता. तर त्यानंतर वारंवार भेटूनही हवेली पोलिसांनी दाद दिली नसल्याचा आरोप देखील साकिबच्या परिवाराने केला आहे.
तर तक्रार करताना परिवाराने एकुण २३ मुद्दे उपस्थित केले असून ही आत्महत्या नसून साकिबचा घातपात केल्याचा आरोप त्याच्या आईने तक्रारीत केला आहे. या विषयावर ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल काय भुमिका घेणार याकडे पुणेकरांचे लक्ष राहणार आहे.