अदर पुनावाला यांच्या संस्थेमार्फत ५ लाख रूपयाचे कर्ज बिनव्याजी देण्याचे आमिष दाखवुन ३ जणांची फसवणूक;कोंढव्यातील ” सकिना ” ला अटक

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

अदर पुनावाला यांच्या सेवा भावी संस्थेची कार्यकर्ता व सभासद असल्याचे सांगुन पुनावाला यांच्या संस्थेमार्फत ५ लाख रूपयाचे कर्ज बिनव्याजी देण्याचे आमिष दाखवुन एका महिलेने तिघांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे . याप्रकरणी महिलेविरूध्द मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तिला अटक करण्यात आली आहे.

सकीना ताहिर पुनावाला वय ३२ , रा . वेलकम हॉल , फ्लॅट नं .४ , कोंढवा, पुणे असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे . याप्रकरणी अंकुश ४० , रा . आंबेडकर नगर यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . याबाबत अधिक माहिती अशी की , फिर्यादी हे त्यांच्या घरी असताना सकीना पुनावाला ही त्यांच्या घरी गेली.तिने आपण अदर पुनावाला यांच्या सेवा भावी संस्थेची कार्यकर्ता आणि सभासद असल्याचे त्यांना सांगितले. यांच्या सेवाभावी संस्थेकडून ५ लाख रूपयायाच कर्ज बिनव्याजी देण्याचे आमिष तिने फिर्यादीला दाखविले.

तर इरफान शेख यांच्याकडून २५ हजार रूपये आणि एका महिलेकडुन १७ हजार रूपये रोख स्वरूपात घेतले . सकीनाने तिघांना बँक ऑफ बडोदाचा बनावट चेक देवुन एकुण ५९ हजार रूपयाची फसवणूक केली . दरम्यान , फिर्यादीने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी सकीना पुनावाला हिला मंगळवारी दुपारी अटक केली आहे . तिला न्यायालयात हजर करण्यास नेण्यात आले असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक चेतन भोसले यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here