कोथरूड येथील अपघात प्रकरणी वसुली बहाद्दरावर गुन्हा दाखल करा?
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुणे शहरातील कोथरूड बस स्थानकाजवळ एका महिलेचा मृत्यू झाला, त्याला कारणीभूत सिमेंट रोड मिक्सर वाहने.. पुणे शहरात सकाळी ९ पासून ते रात्री १० पर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असली तरी, अद्यापही फक्त बंदी कागदावरच राहिल्याची दिसून येते आहे. आज सकाळी कोथरूड बस स्थानकाजवळ सिमेंट मिक्सर वाहनाने जोरदार धडक मारल्याने एका महिलेचा जागीच मृत्यु झाला.
याला जबाबदार फक्त आणि फक्त वाहतूक वसुली बहाद्दरच आहे. अवजड वाहनांकडून वसुली करून, मलाई चखायची आणि नागरिकांचा जीव घ्यायचा? सदरील महिलेने सकाळी घरातून निघताना विचार देखील केला नसावा की, काही मिनिटानंतर जीव गमवावा लागेल. परंतु वाहतूक पोलिसांना याचे काही देणे घेणे नाही.
या घटनेमुळे शहरात अवजड वाहतुकीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.या वाहनांमुळे शहरातील रस्त्यांवर दररोज वाहतुकीची कोंडी होते. अवजड वाहने वेगात धावत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
अवजड वाहतुकीमुळे होणार्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.तर कारवाईसाठी कोणतेच नियोजन नसल्याने अवजड वाहतुकीचा विषय परिसरात धोकादायक झाला आहे.वाहतूक पोलिसांचे विभागाचे वाहनधारकांशी लागेबांधे असल्याने अजून किती बळी घेतले जाणार? यात सामिल असलेल्या वसुली बहाद्दरावर गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.