पुण्यातील रेशनिंग कार्यालयातील त्या नायब तहसीलदारांची फक चर्चाच चर्चा,

0
Spread the love

रेशनिंग व शिधापत्रिका कामकाजा संदर्भात नागरिकांनी केली प्रशंशा.

दिनेश तावरे यांचा ३० पेक्षा जास्त संस्था, संघटनांनी केला गौरव.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, रेशनिंग खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरूध्द बघण्याचा दृष्टीकोन नागरिकांचा वेगळाच असतो, सारखे हेलपाटे, हुज्जत, आपलूकी विसरल्याचे अनेक नागरिक संताप व्यक्त करताना दिसतात. परंतु पुण्यातील निगडी येथील अ” ज” रेशनिंग कार्यालयातील पारदर्शक कामकाजा बद्दल चर्चा व सगळी कडे प्रशंसा केली जात आहे.

रेशनिंग कार्यालयातील येणाऱ्या नागरिकांना आपलूकीने विचारणारे, नागरिकांची अडचण समजून घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम अन्नधान्य अ” ज” परिमंडळ अधिकारी करत आहेत.

अश्या कामांमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच आता ते कार्यालय आय एस ओ मानांकन प्राप्त होणार असल्याने सदरील कार्यालयातील कामकाजात पारदर्शकता आणखीनच आली आहे.दिनेश तावरे यांची ३० पेक्षा जास्त संस्था, संघटनांनी गौरव केला आहे.

या संदर्भात दिनेश तावरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर कमी वेळेत जास्तीत जास्त सेवा नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे. संस्था संघटनांनी केलेला गौरव हा माझ्या एकट्याचा नव्हे तर संपूर्ण कर्मचाऱ्यांचा आहे. या गौरवाने आणखीन काम करण्याची ऊर्जा प्राप्त होते. तसेच वारंवार आम्हाला विभागीय पुरवठा अधिकारी त्रिगून कुलकर्णी व अन्न धान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांच्याकडून मार्गदर्शन मिळत असल्याचे तावरे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here