सहायक पोलीस फौजदार संजय तावरे व राणी खांदवे यांचा प्रकार आला समोर.
वाहतूक पोलिस उपायुक्त यांच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांचे जाबजबाब तर घेण्यात आले कारवाईचे मात्र काय?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहरातील वानवडी वाहतूक पोलिसांचा आणखीन एक प्रकार आज समोर आला आहे. २९ डिसेंबर २०२३ रोजी सहायक पोलीस फौजदार संजय तावरे यांची ड्युटी ( रोटेशन प्रमाणे) घोरपडी गाव रेल्वे गेट येथे सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत तर राणी खांदवे यांची ड्युटी मम्मादेवी चौक येथे असताना हे दोन्ही आणि आणखीन एक पोलिस, असे गोळीबार मैदानापासून कोंढवा कमांड हॉस्पिटल कडे जाणाऱ्या मार्गावर पावत्या फाडताना पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधींनी फोटो व्हिडिओ काढले होते. त्याची भनक तावरे, खांदवे यांना लागताच त्यांनी वाहनाचा पाठलाग करून काही व्हिडिओ डिलीट मारले होते. आणि त्यानंतर बघून घेण्याची धमकी दिली होती.
पुणे सिटी टाईम्सकडील व्हिडिओची पुन्हा पाहणी केली असता, MH.12.JS.6131 रिक्षा, MH.12.DT.2894 रिक्षा, MH.12.QR.3265 तीन चाकी टेम्पो व्हिडिओत संजय तावरे, राणी खांदवे यांनी धरून ठेवल्याचे दिसून आले. आणि त्या चालकांसोबत बोलताना दिसून येते आहे. परंतु वाहतूक शाखेच्या चलन मशीनवर वरील वाहनांचे नंबर टाकून २९ डिसेंबर २०२३ रोजी पावत्या, चलन करण्यात आले आहे का?
WANORI TRAFFIC POLICE VIDEO👇 https://www.instagram.com/reel/C1ojqHAKsmQ/?igsh=MWh0N24wdGhqaWtvaA==
याची खातरजमा केली असता, MH 12JS 6131 रिक्षाचे १८ मार्च २०१८ ते मार्च २०२३ पर्यंत चलन पेंनडींग असल्याचे दिसून आले. तर MH.12.DT.2894 रिक्षाचे १३ नोव्हेंबर २०१८ ते १५ फेब्रुवारी २०२१,आणि MH.12.QR. 3265 टेम्पोचे २८ सप्टेंबर २०२० रोजीचे चलन दाखवण्यात आले.
पावत्या ( चलन) करायचेच नव्हते तर गाडया अडवून का धरले होते? मग तावरे आणि खांदवे यांनी गाडया धरून खिसे भरलेत का?आता असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वानवडी वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांना पुणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या कार्यालयात बोलावून जाबजबाब घेण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.आता या सर्व प्रकारावर पुणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर काय कारवाई करतील याकडे लक्ष टिकून राहणार आहेत.