पुणे सिटी टाईम्स: प्रतिनिधी, पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत लाच प्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या आहेत.तर एक सहाय्यक फौजदार फरार झाला आहे.
एसीबीच्या कारवाईमुळे पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयात प्रचंड खळबळ उडाली आहे. सांगवी पोलिस ठाण्याच्या परिसरातच ‘ट्रॅप’ यशस्वी झाल्यानं पोलिस दलात चर्चा रंगली आहे.
महिला पोलिस उपनिरीक्षक हेमा सोळंके असे महिला पोलिसाचे नाव आहे.तर सहाय्यक फौजदार अशोक देसाई हे फरार झाल्याचे समजत आहे.
उपाधिक्षक श्रीहरी पाटील यांनी कारवाई सुरू असल्याचं सांगितलं आहे.केलेल्या तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केली असता त्यामध्ये महिला उपनिरीक्षक हेमा सोळुखे आणि सहाय्यक फौजदार अशोक देसाई हे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले.